इचलकरंजी: विजय मकोटे
दि.०२: इचलकरंजी-सांगली रोडवरील वाढत्या वाहतुकीचा ताण कमी होण्याच्या दृष्टीने महत्वाचा असलेल्या सांगली रोड ते रिंग रोड या जोड रस्त्याच्या कामाचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
सांगली रोड नेहमी गजबजलेला आणि गर्दीचा असल्याने या रोडला पर्याय म्हणून हरीष लाटणे प्लॉट ते रिंग रोड हा रस्ता बळकटीकरणाचा प्रस्ताव तयार करुन त्याला मंजूरीसह निधीही मंजूर करण्यात आला. याकामी आमदार राहुल आवाडे यांनी शासन दरबारी पाठपुरावा करत १.१५ कोटीचा निधी मंजूर करून आणला. या पर्यायी रस्ता कामामुळे सांगली रोडवर होणारी वाहतुकीची कोंडी व वाढता ताण कमी होणार आहे. हे काम सुरु झाल्यामुळे वाहनधारक व नागरिकांतुन समाधान व्यक्त होत आहे.
याप्रसंगी हरिष लाटणे, पुष्कर लाटणे, स्थायी समिती सभापती सतीश मुळीक, नगरसेविका सौ. रूपा बुगड, रवी रजपुते, श्रेणिक मगदूम, सुशांत कलागते, अभिषेक वाळवेकर, मारुती पाथरवट, संजय केंगार, राहुल घाट, सचिन माळी, किशोर पाटील, जयेश बुगड, अनिकेत चव्हाण आदिसह भागातील नागरिक उपस्थित होते.