इचलकरंजी: विजय मकोटे
दि.४: मणेर हायस्कूलने सन २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या NMMS (National Means Cum Merit) शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता ८ वीतील एकूण ४२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, त्यापैकी ३ विद्यार्थ्यांनी शासकीय शिष्यवृत्तीसाठी निवड मिळवली आहे.
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता १२ वीपर्यंत दरवर्षी रुपये १२,000 प्रमाणे एकूण ४८,000 रुपयांची शिष्यवृत्ती मिळणार आहे. यामध्ये कोळेकर अथर्व अमोल (१४७ गुण, मेरिट ४१ – SBC-४), नागरगोजे राधाबाई दिलीप (१३१ गुण, मेरिट ४१ – NTD-१) आणि सुतार अंजली अमोल (१३० गुण, मेरिट ४१ – TR-OBC-११२ ) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शीतलकुमार मणेर, उपाध्यक्ष मा. श्री. सुभाष केतकर आणि सचिव मा. श्री. अनिलकुमार मणेर यांनी अभिनंदन केले. तसेच हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या सौ. वैशाली मंगुळे, उपमुख्याध्यापिका सौ. संगीता ढणवडे, प्राथमिक मुख्याध्यापिका सौ. पुष्पा एणापुरे यांच्यासह सर्व शिक्षक-शिक्षिकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे विभागप्रमुख सौ. स्वाती कळवे तसेच संपूर्ण हायस्कूल स्टाफचे मार्गदर्शन लाभल्याचे नमूद करण्यात आले आहे. विद्यालयाच्या वतीने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन करण्यात आले.