इचलकरंजी : विजय मकोटे
दि.४ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावीच्या नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात गंगा एज्युकेशन सोसायटी संचलित श्रद्धा जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्सने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. सातत्यपूर्ण उत्कृष्ट निकालासाठी ओळख असलेल्या या महाविद्यालयाने यंदाही आपल्या गुणवत्तेची छाप अधोरेखित केली. महाविद्यालयातील कु. दर्शन भन्साळी हिने ९७.१७ टक्के गुण मिळवले, तसेच कु. उन्नती सारडा आणि कु. प्रतीक पाटील यांनी प्रत्येकी ९७ टक्के गुण मिळवत उल्लेखनीय कामगिरी नोंदवली. या निकालातील विशेष बाब म्हणजे सहा विद्यार्थ्यांनी अकाउंटस् विषयात १०० पैकी १०० गुण मिळवले, तर दोन विद्यार्थ्यांनी गणित विषयात आणि दोन विद्यार्थ्यांनी आयटी विषयात शतप्रतिशत गुण प्राप्त केले.
याशिवाय, ३४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवत आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. अकाउंटस् विषयातच ३७ विद्यार्थ्यांनी ९५ पेक्षा अधिक गुण मिळवले असून इकॉनॉमिक्स, ओसीएम, गणित, आयटी आणि एस.पी. या सर्व विषयांत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट यश मिळवले आहे. कोणत्याही ट्यूशन क्लासेसशिवाय फक्त महाविद्यालयात करून घेण्यात आलेल्या तयारीच्या जोरावर वर्षानुवर्षे इतके मोठे निकाल हे महाविद्यालयाचे वैशिष्ट्य आहे.
सीए फाउंडेशनच्या तयारीसोबतच बोर्ड परीक्षेची भक्कम तयारी करून घेण्याची महाविद्यालयाची विशेष पद्धत या निकालातून स्पष्टपणे दिसून येते. हा सर्वोत्कृष्ट निकाल महाविद्यालयाच्या सक्षम व्यवस्थापन, अनुभवी शिक्षकवृंद आणि विद्यार्थ्यांच्या परिश्रमांचे फलित असल्याचे मानले जात आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री. ए. आर. तांबे, समन्वयक श्री. एम. एस. पाटील, समन्वयिका सौ. संगीता पवार, सौ. सुप्रिया कौंदाडे, श्री. अभिषेक तांबे, सौ. सृष्टी तांबे, सौ. मधुरा कानिटकर, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.