इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.३:पंचगंगा नदी प्रदूषण नियंत्रणासाठी सर्व संबंधित घटकांची एकत्रितपण उपाययाेजना करणे आवश्यक आहे. केवळ प्राेसेस उद्याेगांना लक्ष्य करुन त्यांचे कामकाज बंद करणे हा समस्येचा शाश्वत उपाय नाही. पर्यावरण संरक्षण आणि राेजगार संरक्षण यांचा समताेल राखून निर्णय घेण्यात यावा, अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय प्राेसेसिंग कामगार संघटना (इंटक) यांच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले. अन्याय झाल्यास नाईलानास्तव आम्हालाही आंदाेलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
मागील काही महिन्यांपासून पंचगंगा प्रदुषण प्रश्नावरुन शिराेळ तालुक्यातील ग्रामस्थांनी आंदाेलन छेडले आहे. प्रदुषणाला इचलकरंजीतील प्राेसेसना जबाबदार धरले जात आहे. त्यातून महिन्याभरापासून प्राेसेस बंद असल्याने कामगारांवर बेराेजगाराची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी शिंदे यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात, प्रदूषणासाठी केवळ इचलकरंजीतील प्राेसेसना जबाबदार धरुन त्या बंद करणे याेग्य नाही. पंचगंगा नदीच्या प्रदूषणासाठी विविध घटक कारणीभूत असून पंचतारांकित उद्याेगांकडूनसुद्धा ओढ्यात पाणी साेडण्यात येत आहे. रुई बंधाèयाजवळ लाखाे लिटर रसायनमिश्रित पाणी नाल्यातून नदीत साेडले जाते. तसेच पार्वती इंडस्ट्रीजमधूनही पाणी नदीत जाते. असे असताना केवळ इचलकरंजीतील प्राेसेस उद्याेगांवर कारवाई करणे अन्यायकारक आहे. आंदाेलकांकडून इचलकरंजीतीलच प्राेसेस बंद करण्याचा आग्रह धरला जात आहे. प्रक्रिया केलेले पाणी शेतीला देण्याची जबरदस्ती केली जात आहे. शेतीची उपलब्धता कमी असल्यामुळे उद्याेग तीन-चार दिवस चालू राहतात आणि नंतर बंद राहतात, त्यामुळे कामगारांना नियमित राेजगार मिळत नसल्याने उदरनिवार्हाचा प्रश्न निर्माण हाेत आहे. त्यामुळे पर्यावरण संरक्षण आणि राेजगार संरक्षण यांचा समताेल राखून निर्णय घेणे गरजेचे असून कामगारांना याेग्य न्याय द्यावा व औद्याेगिक शांतता टीकवावी म्हटले आहे.
शिष्टमंडळात शिवाजी भाेसले, प्रदिप साहू, दशरथ माेहीते, राजेंद्र बचाटे, नरसिंह पारीक, मंगल सुर्वे, पंढरीनाथ गलगले, अरुण शिंगे, अमाेल गाेंधळी, अविनाश शिंदे, रमेश गडकरी, बापू घुले आदींसह कामगार उपस्थित हाेते.