योगाने निरोगी जीवनाचा संदेश; मणेरे विद्यालयात आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा

इचलकरंजी: प्रतिनिधी

दि.२२: श्री. डी. ए. मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सौ. कुसुमताई बालमंदिर, सौ. कुसुमताई प्राथमिक विद्यामंदिर, मणेरे हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज व कुसुम ऑलिम्पियाड, इचलकरंजी येथे २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

     कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्याध्यापिकांनी योगदिनाचे महत्त्व विषद केले. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे विविध आजारांचे प्रमाण वाढत असून, योग हा शरीर, मन आणि आत्मा यांचा समतोल साधणारा प्राचीन भारतीय व्यायाम प्रकार असल्याचे त्यांनी सांगितले. नियमित योगाभ्यासामुळे शरीर निरोगी राहते, मन शांत होते, एकाग्रता वाढते तसेच श्वसनक्रिया सुधारण्यास मदत होते. योगाच्या माध्यमातून आरोग्य, शांतता आणि संतुलित जीवनाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला.

     यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे प्रात्यक्षिक दाखविण्यासाठी श्री. प्रशांत अशोक शेडशाळे, सौ. प्रियांका प्रशांत शेडशाळे, श्री. संजय बाबुराव भडाळे, सौ. सविता संजय भडाळे, श्री. दिनेश पांडुरंग चव्हाण व सौ. दक्षता दिनेश चव्हाण उपस्थित होते. त्यांनी विविध योगासने आणि प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक सादर करत त्यांचे आरोग्यदायी फायदे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

     कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी उत्साहाने सहभाग घेतला. योगाभ्यासाच्या माध्यमातून निरोगी जीवनशैलीचा संदेश देत योगदिन संस्मरणीय पद्धतीने साजरा करण्यात आला.या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष शितलकुमार मणेरे, उपाध्यक्ष सुभाष केटकाळे, सचिव अनिलकुमार मणेरे, मार्गदर्शक अशोक वसगडे, मणेरे हायस्कूलच्या प्राचार्या वैशाली मंगसुळे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका पुष्पा ऐनापूरे, बालवाडी विभागप्रमुख स्वाती ढेकळे, कॉलेज विभागप्रमुख दिपाली चौगुले, कुसुम ऑलिम्पियाड विभागप्रमुख शैलेश कांबळे यांच्यासह सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.