धाक दाखवत तरुणाला लुटले; १ लाख २३ हजारांचा ऐवज लंपास

इचलकरंजी, विजय मकोटे 
दि.२६: भोने माळ परिसरात भरदिवसा एका तरुणाला  धाक दाखवत मारहाण करून त्याच्याकडील मोबाईल, रोख रक्कम आणि अॅक्सेस मोपेड असा तब्बल १ लाख २३ हजार २०० रुपयांचा ऐवज लुटल्याची घटना शुक्रवारी (दि. २६) दुपारी घडली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  रुतिक जिव्हाजी कौले व्यवसाय मजुरी, रा. लांडे हॉस्पीटल जवळ भोने माळ इचलकरंजी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुपेश पंडित नरवाडे रा. शास्त्री सोसायटी भोने माळ, इचलकरंजी ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर आणि सुमीत प्रदिप परीट रा. साई मंदीरजवळ कबनूर ता. हातकणंगले,यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०९(६) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस ठाणेकडून मिळालेली माहिती अशी की  शुक्रवारी (दि. २६) दुपारी  भोने माळ, इचलकरंजी येथील महालक्ष्मी मिल स्टोअरच्या बाजूला असलेले असीफ पठाण यांचे ऑफिसचे समोरील रस्त्यावर फिर्यादी उभा असताना  यातील आरोपी क्र १ व २ हे निळ्या रंगाच्या अँक्सीस मोपेड वरुन आले व आरोपी क्र.१ याने फिर्यादीची गळपट पकडून फिर्यादीला “तुला माहित नाही का? माझ्यावर मोका लावुन पण माझे कोणी वाकडे करु शकले नाही, मला इचलकरंजी तील सर्व लोक घाबरतात, तुला माझी भिती आहे की नाही ? तुझ्याकडील पैसे व मोबाईल गप्पपणे मला दे ” असे म्हणून माझ्या पॅन्टच्या खिशात हात घालून जबरदस्तीने माझ्या खिशातील पैसे काढून घेवू लागला त्यावेळी फिर्यादी  बचाव करण्यासाठी आपला  मित्र अनिल लोहार यास हाक मारली असता ते पाहून आरोपी क्र  १ याने फिर्यादीस  सोडून, “तु ह्याला वाचवणार काय?” असे म्हणत, शिवागाळ करीत अनिल लोहार याच्याकडे गेला. त्यावेळी तेथून फिर्यादी निघून गेला व सुमारे १० मिनीटांनी सदर ठिकाणी फिर्यादी पुन्हा परत आल्याचे पाहून आरोपी क्र१ व २ यांनी फिर्यादीला शिवीगाळ करुन फिर्यादीच्या कानाखाली मारुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जबरदस्तीने फिर्यादीकडे असलेले आयफोन १६ व विवो व्ही २० प्रो असे दोन्ही मोबाईल हिसकावून घेतले व आरोपी क्र १ याने फिर्यादीला जीवे मारण्याची धमकी देवून फिर्यादीच्या दोन्ही मोबाईलचे पासवर्ड घेतले. त्यावेळी त्याने पासवर्ड टाकून फिर्यादीच्या आयफोन मोबाईलमधील असलेल्या फोन पे वरील बॅलॅन्स पाहून “बास की मला एवढ पैसे” असे म्हणून फिर्यादीच्या मोपेडची डिक्की उघडून त्यातील फिर्यादीचे ३२००.०० रुपयेअसलेले पैशाचे पाकीट काढून घेतले व फिर्यादीची मोपेड घेवून, १.२३,२०० /- रुपये किंतीचे साहीत्य व रोख रक्कम काढून घेवून निघून गेले आहेत.                 आरोपी क्र १ याचेवर यापूर्वी बरेच गुन्हे दाखल असून तो अशाप्रकारे दहशत माजवून लोकांचे कडून पैसे काढुन घेत असतो. त्याचे पासून व आरोपी क्र २ याचेकडुन फिर्यादीचे जिवीतास धोका असल्याची फिर्याद  फिर्यादी यांनी दिली .फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास पोलीस निरीक्षक श्री मेमाणे  व पोलीस उपनिरीक्षक वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजीनगर पोलिस करीत आहेत.