इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि.५ : शहर व परिसरातील हिंदू मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गावभागातील हजरत सय्यद मख्तूम वली दर्गाह उरूसानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. तर शनिवार 8 ऑगस्ट राेजी भर ऊरुस आहे. सालाबादप्रमाणे दर्ग्यामध्ये मंगळवारी मंडप चढविला गेला आहे, अशी माहिती अशी माहिती उरूस कमिटीचे अध्यक्ष अयतब मुजावर यांनी दिली.
सालाबादप्रमाणे यंदाही हजरत सय्यद मख्तूम वली दर्गा उरुस माेठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत आहे. यंदाची उरुस कमिटी नियुक्त करण्यात आली असून या कमिटीची बैठक पार पडली.४ ऑगस्ट ते १० ऑगस्ट या कालावधीत उरुस भरणार असून यानिमित्ताने शहनाई वादन, कव्वाली, लंगरखाना असे विविध कार्यक्रम हाेणार आहेत. शुक्रवार ७ ऑगस्ट राेजी सायंकाळी ६ वाजता चंदूर येथील संदीप देसाई व सागर करडे यांचा शहनाई वादनाचा कार्यक्रम हाेणार आहे. तर सायंकाळी ७ वाजता लंगरखाना (महाप्रसाद) हाेईल. तर रात्री ९ वाजता संदल (गंधलेपन) करणेत येणार आहे.
शनिवार दि. ८ ऑगस्ट राेजी भर उरूस आहे. या दिवशीही विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी १० वाजता संगीत खुर्ची, दाेरी उडी, लिंबू चमचा अशा स्पर्धा हाेतील. सायंकाळी ५ वाजता विविध मान्यवरांचा सत्कार आणि स्पर्धांचा बक्षिस वितरण कार्यक्रम हाेईल. तर सायंकाळी ६.१५ वाजता राजस्थान-जयपूरचे प्रसिध्द कव्वाल सरफराज साबरी यांचा कव्वालीचा बहारदार कार्यक्रम हाेणार आहे. रविवार दि. ९ ऑगस्ट राेजी हिंदू-मुस्लिम भाविकांचा नैवेद्य आहे, अशी माहिती अध्यक्ष मुजावर यांनी दिली.
याप्रसंगी मक्तुम मुजावर, बादशाह मुजावर, माैला मुजावर, कादिर मुजावर, बाळू मुजावर, अरबाज खतीब, लुकमान समडाेळे, इनायत मुजावर आदी उपस्थित हाेते. उरूसाच्या निमित्ताने दर्गा तसेच परिसरात आकर्षक विद्युत राेषणाई करण्यात आली आहे. उरूस कमिटीकडून यानिमित्ताने विविध स्पर्धाचे आयाेजन केले आहे. यासाठी कमिटीचे उपाध्यक्ष साद सनदी, खजिनदार सुबहान मुजावर, सेक्रेटरी मुज्जफर शेख, अलताफ शेख, अमन मुजावर, अमीर गवंडी, साकीब मुजावर यांचेसह सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत.