मिरज:प्रतिनिधी
दि 3 डिसेबर: आभिजीत शिक्षण संस्था,पुणे”,संचलीत,
“झिऑन स्कूल, शाखा मिरज चे नवीन वास्तूत स्थलांतर सोहळा दि १ डिसेंबर रोजी उत्साहात पार पडला”,
कोविड१९ च्या पाश्र्वर्वभूमीवर शासनाने पुकारलेला लॉकडाउनच्या प्रदीर्घकाळ शाळा बंद नंतर शैक्षणिक क्षेत्रातील कार्यास शुभारंभ झाला, “झिऑन ग्रुप आॉफ स्कूल,पुणे संचलित झिऑन स्कूल ची शाखा ब्राम्हणपुरी,मिरज येथे आहे सदरची शाळा नविन जागेत स्थलांतर करण्यात आले
या स्थलांतर सोहळ्याचे उद्घाट्न घरेलु माहिला कामगार संघटनेच्या सांगली जिल्हा अध्यक्षा उषा गायकवाड, जेष्ठ व मिरज येथील प्रसिद्ध तबला वादक बाळासाहेब मिरजकर व महालक्ष्मी टाइम्सचे संस्थापक संपादक फिरोज शेख यांच्या हस्ते व अभिजीत शिक्षण संस्थचे अध्यक्ष व निवृत वायुसेना आधिकारी श्री आर बी पाटील यांच्या उपस्थितीत झाला
कार्यक्रमाची सुरवात राष्ट्रध्वजारोहन करुन राष्ट्रगीताने झाली .पाहुण्याच्या हस्ते दिप प्रज्वलन व सरस्वती फोटाचे पूजन करण्यात आले यावेळी आजी माजी शिक्षक शिक्षिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी
श्री अरूण भोरे ,मोहसीन मिरजकर, सौ. सारीका बसरगे,
सौ आश्विनी आडमुठे, सौ रईसा चिंचणीकर सौ. सुनीता बोरगावे, ढोणे मावशी ,तसेच सर्व आजी माजी विद्यार्थी,शिक्षक आणि पालक यांची उपस्थिती होती