राष्ट्रवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते सहदेव बेटकर यांना जिल्हाध्यक्ष पद देण्याची मागणी

संगमेश्वर :वहाब दळवी

दि.4 संगमेश्वर तालुक्यातील  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते श्री. सहदेव देवजी बेटकर यांचे राष्ट्रवादी पक्षाचे  कट्टर व एकनिष्ठ लोकप्रतिनिधी म्हणून जिल्हात नावलौकिक आहे गेले वीस ते पंचवीस ते वर्षे राष्ट्रवादी पक्षाचे काम करीत असून श्री.बेटकर यांनी गुहागर मतदारसंघातून विधान सभा निवडणूक सन 2019 आली लढवली होती त्यावेळी ते चौपन्न हजार तीनशे मतांनी पराभूत झाले होते.पराभूत झाल्यानंतर त्यांनी पक्षाचे काम सोडले नाही.त्या वेळेपासून आजपर्यंत ते आपल्या गुहागर मतदारसंघातील वाडी वाडी मध्ये तसेच गावो गावी जाऊन लोकांच्या समस्या, गोरगरिबांना मदत आणि राष्ट्रवादी पक्ष वाढविण्याचे काम करीत असून आहेत राष्ट्रवादी पक्षाचे प्रामाणिकपणे काम करणाऱ्या श्री. सहदेव देवजी बेटकर यांना राष्ट्रवादी पक्षाने जिल्हाध्यक्ष पद द्यावे अशी मागणी गुहागर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी पक्षाच्या पुढाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी केली आहे.