भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन

 

नागपूर : नंददत्त डेकाटे

भिवापूर (नागपूर) ६ डिसेंबर भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त चंद्रमणी बौद्ध विहार कमिटी द्वारे अभिवादन करण्यात आले. चंद्रमणी बौद्ध विहार कमिटीचे अध्यक्ष चंदुलाल डेकाटे यांनी भगवान बौद्ध यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.व त्रिसरण पंचशील घेण्यात आले.

यावेळी मनोहर वानखेडे यांनी मार्गदर्शन केले व ग्रा.सदस्या कल्पना सुर्यवंशी व मेघा मुन यांनी भीम गीत सादर केले यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रतिक वाचनालय चे चिंतामण राऊत हे होते. यावेळी गावातील तलाठी डि. एम. भोयर, ग्रामपंचायत सदस्य विग्नेश्वर रामटेके, ग्रामपंचायत सदस्य कल्पना सुर्यवंशी, रविंद्र मेश्राम, गोवर्धन शिंगाडे, नंददत्त डेकाटे,रमेश राऊळ, विलास मेश्राम, शितल सावईमून, चरण शेंडे बौद्ध उपासक व उपासिका यावेळी उपस्थित होते.