रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सहकारातून आणली हरितक्रांती

कबनूर :अन्वर मुल्ला 

दि.१५: देशभक्त स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांनी सभासद व कामगारांचे जीवनमान उंचावण्याबरोबरच त्यांच्या हिताचे जतन करण्याच्या उद्देशाने या भागात सहकार तत्त्वावर साखर कारखाना सुरू केला. कारखान्याच्या माध्यमातून उपसा सिंचन योजना राबवून हातकणंगले व शिरोळ तालुक्यांत हरितक्रांती घडवून आणली, असे गौरवोद्गार दे.भ. रत्नाप्पाण्णा कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील यांनी काढले.स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या ११७ व्या जयंतीनिमित्त कारखान्याचे चेअरमन पी. एम. पाटील, व्हाईस चेअरमन प्रताप उर्फ बाबा शामराव पाटील, संचालक, रेणुका शुगर्सचे पदाधिकारी, इंटकचे पदाधिकारी, वाचनालयाचे पदाधिकारी तसेच कारखान्याचे कामगार यांनी स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या स्मृतीस अभिवादन केले. यावेळी आयोजित कार्यक्रमात पी. एम. पाटील बोलत होते.

        कबनूर येथील स्व. रत्नाप्पाण्णा कुंभार यांच्या अर्धपुतळ्यास संचालक प्रमोद पाटील यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.यावेळी संचालक धनगोंडा पाटील, कुमार खूळ, प्रताप नाईक, संतोष महाजन, विशाल आवटी, प्रमोद पाटील, महावीर चौगुले, संजय देसाई, प्रकाश खोबरे, बाबासो पाटील, बापू मोटे, भूपाल मिसाळ, रंजना निंबाळकर, शोभा पाटील, कार्यकारी संचालक आय. एम. जमादार, इंटकचे अध्यक्ष आझाद शेख, रेणुका शुगर्सचे प्रकाश सावंत, शिरीष राशनकर, सी. एस. पाटील, प्रकाश केणी यांच्यासह इंटक व कारखान्याचे पदाधिकारी आणि कामगार उपस्थित होते.संचालक रावसाहेब भगाटे यांनी आभार मानले.