इचलकरंजी : संजय आंबे
दि:७ डिसेंबर भाजपा प्रदेश उपाध्यक्ष श्री सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखली व शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ओ बी सी सेलच्या शहराध्यक्ष पदी श्री अर्जुन सुतार यांची निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून शहराच्या विविध भागामध्ये असंघटित बांधकाम कामगारांची शासन दरबारी नोंद करून त्यांना शासनाचे लाभ मिळवून दिले. तसेच केंद्र सरकारच्या उज्वला गॅस योजनेतून शेकडो महिलांना मोफत गॅस संच मिळवून दिला. त्याच बरोबर महापुराच्या काळात श्री कालिका देवालय ट्रस्ट, ओ बी सी समाज कालिका देवालय माध्यमातून इचलकरंजी, चंदूर या पूरग्रस्त भागातील नागरिकांना मोफत जेवण व्यवस्था केली. कोरोना काळात ओ बी सी समाज्याच्या वतीने जिवनावश्यक वस्तूपासून त औषधोपचार असलेले कीट वाटप केले. सुरेश हाळवणकर यांच्या मार्गदर्शनाखली पक्षाच्या अनेक पदावर राहून पक्षाचे काम समाजातील प्रत्येक घटकात वाढवून त्याच्या समस्या सोडविण्याचे काम करून, पक्ष वाढीसाठी केलेल्या कामाची दखल घेऊन सुरेश हाळवणकर यांनी भाजपा ओ बी सी सेलच्या शहराध्यक्ष पदी निवड केली. या निवडीचे पत्र सुरेश हाळवणकर यांच्या हस्ते देण्यात आले. यासाठी शहराध्यक्ष अॅड. अनिल डाळ्या यांनी विशेष प्रयत्न केले.
भाजपा ओ बी सी सेलच्या मध्यमातून समाजाला असलेल्या अडी-अडचणी सोडविण्याचा, तळागाळातील होतकरू, सुशिक्षित विद्याथ्यर्थ्यांसाठी, नागरिकांना शासनाच्या विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे सांगितले. मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओ बी सी समाजाचे राजकीय आरक्षणाच कायदा पास करून तो सुप्रिम कोर्टामध्ये टिकवून ठेवला होता. पण महाविकास आघाडी सरकारच्या अकार्यक्षमतेमुळे महाराष्ट्रातील ओ बी सी समाजाचे राजकीय आरक्षण रद्द झाले आहे. ते आरक्षण मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरून लढई लढू असे सांगितले.
या निवडी वेळी श्री कालिका देवालय ट्रस्टचे विश्वस्त श्री प्रकाश रायाप्पा सुतार, भाजपा ज्येष्ठ नेते धोंडीराम जावळे, अरुण कुंभार, अरविंद शर्मा, राजेंद्र पाटील, प्रवीण पाटील, पवन कुंभार, जहांगीर पटेकरी, अनंत पारीख, केशव लायकर, आकाशा मुल्ला आदी पदाधिकारी उपस्थित होते