रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व मोरया ग्रुप तर्फे रक्तदान शिबिरात 102 बाटल्या रक्त जमा

इचलकरंजी :अन्वर मुल्ला 

दि.२४: येथील रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी व मोरया ग्रुप प्रणित छावा प्रतिष्ठान इचलकरंजी यांच्या संयुक्त सहकार्याने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले, सदर शिबिर रुणवाल टॉवर जवळ, पीएनजी समोर मोरया गणेशोत्सव मंडळ येथे गणेशोत्सवानिमित्त घेण्यात आले.

     रक्तपेढीमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने व रुग्णांना रक्ताची गरज भासत असल्याने हे रक्तदान शिबिर मोठ्या प्रमाणात घेण्यात आले. या रक्तदान शिबिरा करीता रक्तदान करणे करता शहरवासीयांना आवाहन करण्यात आले यामध्ये स्वयंस्फूर्तीने १०२ जणांनी रक्तदान केले रक्त संकलन सुरक्षा ब्लड बँक, गुलबर्गा यांनी केले. या रक्तदान शिबिराप्रसंगी रोटरी क्लबचे अध्यक्ष पंकज कोठारी, सेक्रेटरी सुनील यळरूटे, प्रकाश रावळ, सत्यनारायण धूत, शिवदास कित्तुरे ,संजय घायतिडक प्रकाश गौड, इत्यादी पदाधिकारी तसेच मोरया ग्रुपचे श्री प्रशांत सुतार, प्रथमेश भोणे, कुणाल थोरवत, पार्थ फणसळकर, अमोघ स्वामी यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते .शिबिरासाठी सुरक्षा ब्लड बँकेचे डॉक्टर्स व स्टाफचे बहुमोल सहकार्य लाभले.