इचलकरंजी :अन्वर मुल्ला
दि.२४ :जिल्हा क्रीडा कार्यालय, कोल्हापूर व इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय शासकीय मनपास्तर कुस्ती स्पर्धांना उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेचे उद्घाटन अतिरिक्त पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी अमृत मामा भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून १४, १७ व १९ वर्षांखालील मुले व मुली यांच्या फ्रीस्टाइल व ग्रीको-रोमन या गटांतील कुस्ती स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.स्पर्धाप्रमुख भिकाजी माने यांनी स्वागत केले तर क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित सर्व मान्यवरांना रोपटी देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी अण्णासाहेब जाधव यांनी विद्यार्थ्यांनी कुस्तीच्या माध्यमातून आपली प्रगती साधावी, असे आवाहन केले. खेळाच्या माध्यमातून तयार होणारी सशक्त तरुण पिढी देशाला बलवान बनवते असे प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी इचलकरंजी महानगरपालिकेचे क्रीडाधिकारी सूर्यकांत शेटे, क्रीडा पर्यवेक्षक सचिन खोंद्रे, प्रसाद बडवे, स्पर्धा प्रमुख भिकाजी माने यांच्यासह कुस्तीचे नामवंत वस्ताद बाळू जाधव, बाळू शिंदे, दिलीप माने, शंकर बंडगर, बंडा उगळे, अंकुश पसारे, तानाजी बंडगर, रमेश चौगुले, मोहन सादळे, महेश पारसे तसेच क्रीडा शिक्षक विजय गुरव, डॉ. राहुल कुलकर्णी, कार्तिक बचाटे, श्याम कांबळे, संजय परीट, अमित कागले, अमित कुंडले, विनायक भोई, संदीप फासे यांच्यासह क्रीडाशिक्षक, मार्गदर्शक व खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्पर्धेसाठी पंच म्हणून सतीश सूर्यवंशी, सूरज मगदूम, यासीन मुजावर, बाणगे येथील वैभव तेली व आमशी येथील महेश पाटील कामकाज पाहत आहेत. या स्पर्धेतील विजेते खेळाडू आगामी विभागीय स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. त्यामुळे स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंमध्ये विभागीय स्तरावर स्थान मिळविण्यासाठी चुरस निर्माण झाली आहे.