डिकेटीईच्या २६ विद्यार्थ्यांची एसएलके सॉफटवेअर कंपनीत निवड

इचलकरंजी: विजय मकोटे

दि 9 डिसेंबरः डिकेटीईच्या इंजिनिअरींग विभागातील विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या एसएलके या आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनीच्या ऑनलाईन कॅम्पस इंटरव्हयू मधून डिकेटीईच्या २६ विद्यार्थ्यांची निवड केली आहे.
डीकेटीईच्या ट्रेनिंग अ‍ॅण्ड प्लेसमेंट विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या कॅम्पस इंटरव्हयूवच्या तयारीसाठी विषेश ट्रेनिंगची व्यवस्था केली जाते. जगामध्ये होत असलेल्या तांत्रिक क्षेत्रातील बदलानुसार महाविद्यालयाचा अभ्यासक्रम तयार केला जातो. तसेच अभ्यासक्रम तयार करताना औद्योगिक क्षेत्रातील भविष्यातील निकष, तंत्रज्ञान यांचा विचार केला असून त्या अनुशंगाने अभ्यासक्रम शिकवला जातो यामुळे डीकेटीईच्या विद्यार्थ्यांची बहुराष्ट्रीय कंपनीत निवडीचा मार्ग मोकळा होत आहे.
एसएलके सॉफटवेअर ही आंतरराष्ट्रीय सॉफटवेअर कंपनी असून भारतामध्ये या कंपनीचे मुख्य कार्यालय बेंगलोर येथे आहे. ही कपंनी सॉफटवेअर डेव्हलपमेंट, सेवा आणि तंत्रज्ञान तसेच सॉफटवेअर टेस्टींग आणि व्यवस्थापन सेवा यासारख्या सेवा पुरवते. यावेळी ऑनलाईन पध्दतीने आयोजित केलेल्या इंटरव्हयूवमध्ये अ‍ॅप्टीटयूट टेस्ट, टेक्नीकल टेस्ट आणि एचआर फेरी इ.मधून २६ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
निवड झालेल्या विद्यार्थी कॉम्प्युटर विभागामधून – योगिता कुंभार, श्रेया पाटील, मृणल कदम, ओंकार रानभरे, वचनसौम्या नाईकवाडे, साक्षी व्हनाले, चारुता कुलकर्णी, प्राजक्ता चोते, यशदा ठोंबरे, साहील मुल्ला, शिवानी राबडे, धनश्री पाटील, ओंकार शिंदे, स्नेहा कोळी, नेहा महाजन, वैष्णवी बीराजदार, श्रुती बीराजदार, रौनक शहा, नेहा तोष्णीवाल मेकॅनिकल विभागामधून – प्रदनेश भोसले, अर्षद मुजावर इलेक्ट्रीकल विभागामधून – शुभम पवार, पंकज नलवडे इटीसी विभागामधून – रेवती मदनाईक, श्रुती काळे तर इलेक्ट्रॉनिक्स विभागामधून – प्रियंका स्वामी यांची निवड झाली आहे.सदर विद्यार्थ्यांना संस्थेचे संचालक प्रा.डॉ.पी.व्ही.कडोले, उपसंचालक डॉ.यु.जे.पाटील, उपसंचालिका डॉ.सौ.एल.एस.अडमुठे व टीपीओ प्रा.जी.एस. जोशी, सर्व विभागप्रमुख व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.