कोल्हापूर : प्रविण भोसले
दि.२३: कागल नगरपरिषदेच्या वतीने कै. व्ही. ए. घाटगे पर्यटन व नौकायन केंद्र, पाझर तलाव परिसरातील दुसऱ्या टप्प्यातील ‘कासव धबधब्यातील ‘रेन डान्स’ चा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
या प्रकल्पाचे उद्घाटन राज्याचे पर्यटन, खनिकर्म, माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, शाहू समूह ग्रुपचे प्रमुख समरजितसिंह घाडगे, माजी आमदार संजयबाबा घाडगे, कागल नगराध्यक्ष सविता माने, उपनगराध्यक्ष जयवंत रावण व कागल नगरपरिषदेचे नगरसेवक व नागरिक उपस्थित होते.