इचलकरंजी:अन्वर मुल्ला
दि .२९ : कल्लाप्पाण्णा आवाडे काे-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क हा अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देशातील अव्वल स्थानावरील पार्क आहे. या पार्कच्या दानाेळी येथील प्रकल्पाच्या रेखांकनास मंजूरी मिळाली असून तेथील भूखंडही उपलब्ध असल्याची माहिती चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी दिली.कल्लाप्पाण्णा आवाडे काे-ऑप. इंडस्ट्रीयल इस्टेट अॅन्ड इंटीग्रेटेड टेक्स्टाईल पार्क (केएटीपी) या संस्थेची २०. वी वार्षिक सर्वसाधारण सभा गुरुवारी पार पडली. त्याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून चेअरमन प्रकाश दत्तवाडे बाेलत हाेते. याप्रसंगी सहकार महर्षी कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्राेद्याेग मंत्री प्रकाश आवाडे, क. आ. इचलकरंजी जनता बँकेचे चेअरमन स्वप्निल आवाडे यांची प्रमुख उपस्थिती हाेती.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून सभेची सुरुवात करण्यात आली. स्वागत करून प्रास्ताविकात चेअरमन प्रकाश दत्तवाडे यांनी, सहकार महर्षि कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्राेद्याेग मंत्री प्रकाश आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत आधुनिक तंत्रज्ञान असलेला हा महत्वाकांक्षी टेक्स्टाईल पार्क साकारण्यात आला आहे. सध्या १३३ युनिटचे प्रत्यक्षात उत्पादन सुरु असून ३० अतिरिक्त युनिटचे बांधकाम अंतिम टप्प्यात असून तेथेही नजीकच्या काळात प्रत्यक्ष उत्पादनास सुरू हाेईल. शासनाकडून प्राप्त अनुदानातून पार्कच्या ठिकाणी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. २१० एकरातील या वसाहतीमध्ये विविध उद्याेगांमध्ये ३ हजार काेटीची गुंतवणूक हाेऊन तीन हजार लाेकांना राेजगार उपलब्ध झाला आहे. आता पार्कच्या दानाेळी येथील ४५ एकरातील औद्याेगिक वसाहतीच्या रेखांकनास मंजूरी मिळाली असून याठिकाणी १६९ औद्याेगिक भूखंड उपलब्ध आहेत. ज्यांना या भूखंडाशी गरज आहे त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधण्याच आवाहनही त्यांनी केले.
माजी वस्त्राेद्याेग मंत्री प्रकाश आवाडे यांनी, देशातील गतीने वाढणारा आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेला हा टेक्स्टाईल पार्क आहे. याठिकाणी १४०० पेक्षा अधिक आधुनिक यंत्रमाग असून अजुनही येत आहेत. या हायटेक पार्कमुळे वस्त्रनगरीच्या वैभवात भर पडली आहे. पण वस्त्राेद्याेगात नव्याने येणाèया कामगारांची माेठ्या प्रमाणात कमतरता असल्यामुळे या क्षेत्रात आता महिलांना प्रशिक्षित केले जात आहे. त्यातून महिलांना स्वावलंबी हाेण्यासह उद्याेजिका बनविण्यास प्राेत्साहन दिले जात असल्याचे सांगितले.
संस्थेचे कार्यकारी संचालक निशिकांत सावर्डेकर यांनी नाेटीस व विषयपत्रिकेचे वाचन केले. सर्व विषयांना सभासदांनी मंजुरी दर्शवली. आभार संस्थेचे व्हा. चेअरमन बाळासाहेब कलागते यांनी मानले. सूत्रसंचालन रामचंद्र जाधव यांनी केले.
याप्रसंगी साै. किशाेरी आवाडे, राजू मगदूम, प्रसाद खाेबरे, आदित्य आवाडे यांच्यासह संचालक सर्वश्री सर्जेराव पाटील, सुरेश बावणे, रमेश कबाडे, महावीर येळरुटे, अहमद मुजावर, आनंदा काेरे, सुमेरु पाटील, शितल अम्मण्णावर, नरसिंह पारीक, चंद्रकांत इंगवले, महादेव कांबळे, साै. शकुंतला जाधव, श्रीमती सुवर्णा पाटील आदींसह सभासद, उद्याेजक उपस्थित हाेते.