इचलकरंजी –विजय मकोटे
दि.१० : आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या गरजा प्रमाणापेक्षा जास्त वाढवल्या आहेत. त्यामुळे त्याचा त्रास आपल्या हाेत आहे. पुणे मुंबईसारख्या मेट्राे सिटीमधील जीवन धकाधकीचे आहे. आपणच समस्या निर्माण करताे आणि त्यावरील उपाय शाेधण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घालवताे. आपल्या जवळच असलेल्या नैसर्गिक वस्तूंचा वापर करुन आपण चांगली वास्तू निर्माण करु शकताे, असे प्रतिपादन पुणे येथील कन्साेर्टियम आर्किटेक्ट्सचे सत्येंद्र भगत यांनी केले.
असाेशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजी आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आर्किटेक्चर दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी आर्किटेक्ट सत्येंद्र भगत द आर्किटेक्चर बियाँड बिल्डिंग (इमारतींच्या पलिकडची वास्तुकला) या विषयावर मार्गदर्शन करताना बाेलत हाेते. आर्किटेक्चर दिनाचे औचित्य साधत शहर व परिसरातील प्रसिध्द आर्किटेक्ट कृष्णकांत साेनटक्के, विठ्ठल ताेडकर आणि अरिहंत चाैगुले यांना उत्कृष्ठ अल्ट्राटेक आर्किटेक्ट पुरस्काराने आर्किटेक्ट सत्येंद्र भगत व अल्ट्राटेक सिमेंटचे टेरीटाेरी सेल्स हेड अविनाश जेऊरकर यांच्या हस्ते गाैरविण्यात आले. शाल, श्रीफळ, व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप हाेते. तसेच आर्किटेक्ट सत्येंद्र भगत आणि ज्येष्ठ आर्किटेक्ट शिवप्रसाद ओझा यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
स्वागत असाेशिएशन ऑफ इंजिनिअर्स अँड आर्किटेक्ट इचलकरंजीचे प्रेसिडेंट राजेंद्र खंडेराजुरी यांनी केले. अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर नितीन धुत यांनी प्रास्ताविकात अल्ट्राटेक सिमेंटबद्दल सविस्तर माहिती देत वार्षिक उत्पादन क्षमता 200 मिलियन टनांवर पाेहाेचली असून कंपनी देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगत सर्वांच्या सहकार्यामुळे हा महत्वाचा टप्पा गाठला असल्याचे नमुद केले.
अल्ट्राटेक सिमेंटचे विभागीय तांत्रिक प्रबंधक काेल्हापूर सागर छांगाणी यांनी, अल्ट्राटेक सिमेंटचे टेक्निकल प्रेझेंटेशन करताना बांधकामासाठी आवश्यक उत्पादनांची सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन इंजिनिअर जीवन घाडगे आणि आर्किटेक्ट विरेन लखामानी यांनी केले. आभार सेक्रेटरी विकास नाईक यांनी मानले.याप्रसंगी भरत केटकाळे, नितीन शेट्टी, विवेक सावंत, रवींद्र ताेरस्कर, गिरीश माेकाशी, सुहास रुग्गे, प्रकाश मालवीय, अल्ट्राटेक सिमेंटचे डिलर हर्षल धुत, चॅनेल रिलेशनशीप मॅनेजर कल्पक मेहता आदींसह दाेनशेपेक्षा अधिक आर्किटेक्ट व इंजिनिअर्स उपस्थित हाेते. माेठ्या उत्साहपूर्ण वातावरणात हा कार्यक्रम पार पडला.