इचलकरंजी: संजय आंबे
दि१३ डिसेंबर :17 वर्षाखालील मुलींच्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग स्पर्धा कोल्हापूर येथे जिल्हा मुष्टियुद्ध संघटनेमार्फत घेण्यात आल्या या स्पर्धेमध्ये श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल इचलकरंजीची इयत्ता दहावी मधील विद्यार्थिनी कु. सानिया सचिन शिंदे हिने प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक प्राप्त केले
44-46 किलो वजन गटात सानियाने उत्कृष्ट कामगिरी केली
सांगली येथे होणाऱ्या राज्यस्तरीय मुष्टियुद्ध स्पर्धेसाठी तिची निवड झाली आहे
श्री ना.बा. एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट श्रीनिवासजी बोहरा शेठजी, चेअरमन श्री हरीशजी बोहरा , व्हाईस चेअरमन मा. श्री उदयजी लोखंडेसो ट्रेझझर राजगोपालजी डाळ्या, सेक्रेटरी श्री बाबासाहेब वडींगेसो स्कूल कमिटी चेअरमन श्री मारुतराव निमणकर या पदाधिकाऱ्यांनी यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनियर कॉलेजच्या मुख्याध्यापिका श्रीमती गोंदकर एस. एस. , उपप्राचार्य श्री पाटील आर. एस. , उपमुख्याध्यापिका सौ भस्मे एस.एस. व पर्यवेक्षक श्री कांबळे व्ही. एन यांनी सुद्धा खेळाडूंचे अभिनंदन केले
क्रीडा विभाग प्रमुख श्री शेखर शहा सर , सागर चव्हाण सर यांचे खेळाडूंना विशेष मार्गदर्शन लाभले