इचलकरंजी: विजय माकोटेे
दि:१८ डिसेंबर दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवाकेंद्र नदिवेस नाका,इचलकरंजी येथे श्री गुरूदत्त जयंती उत्सव उत्साहात संपन्न झाला.कोविड १९ विषाणू साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहिर केलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करत श्री गुरुदत्तजयंती साजरी करण्यात आली.दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग (नदिवेस नाका) यांचेवतीने श्री दत्त जयंती निमित्त १२ डिसेंबर ते १९ डिसेंबर या कालावधीत श्री गुरुचरित्र पारायण, अखंड नाम जप, यज्ञयाग सप्ताह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
श्री गुरुचरित्र पारायण तसेच दररोज एक याप्रमाणे श्री गणेश याग, मनोबोध याग, श्री चंडी याग, श्री गीताई याग, श्री स्वामी याग, श्री रुद्रयाग,श्री मल्हारी याग संपन्न झाले. तसेच सप्ताह कालावधीत संपूर्ण दिवसभर महिलांचे तर रात्रभर पुरुष सेवेकरी यांचे वतीनेअखंड प्रहरे ची सेवा करण्यात आल्या.
शनिवार 1८ डिसेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता श्री दत्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी झालेल्या महाआरतीस नगराध्यक्षा सौ अलका अशोकराव स्वामी तसेच नगरसेवक मदन कारंडे उपस्थित होते.
रविवारी १९ डिसेंबर रोजी सत्यदत्त पूजन होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांची त्रिकाळ आरती तसेच मानवीय जीवनातील विविध समस्यांवर आध्यत्मिक सेवेतून विनामूल्य मार्गदर्शन करण्यात येत आहे असे सेवा आवाहन केंद्राचे वतीने करण्यात आले आहे.