कोल्हापूर :प्रवीण भोसले
दि.२०:क्रांतीसुर्य, वीर बिरसा मुंडा यांनी भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये मोठे योगदान दिले असून त्यांनी जंगल, जल, जमीन यासाठी तसेच आदिवासींच्या हक्कांसाठी प्राणांची आहुती दिल्याचे प्रतिपादन श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयातील मराठी विभागाचे प्रमुख, प्रोफेसर डॉ. दीपककुमार वळवी यांनी केले. श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयात वीर बिरसा मुंडा यांच्या 151 व्या जयंती दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. शानेदिवाण कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
डॉ. दीपककुमार वळवी म्हणाले,वीर बिरसा मुंडा यांना केवळ पंचवीस वर्षाचे आयुष्य लाभले. त्यांनी आदिवासींना एकत्रित करून इंग्रज सरकार आणि जुलमी जमीनदार यांच्या विरुद्ध उठाव केला. आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आणि जंगल, जल, जमीन वाचवण्यासाठी त्यांनी मोठा लढा उभा केला. इंग्रज सरकारने त्यांना या उठावाबद्दल कारावासाची शिक्षा दिली. त्यांचे कारागृहातच निधन झाले. प्राचार्य डॉ.आर.के. शानेदिवाण म्हणाले, बिरसा मुंडा यांच्यासारखे अनेक स्वातंत्र्यसैनिक अज्ञात आहेत. त्यांच्या कार्याला उजाळा मिळणे गरजेचे आहे. तरुणांनी, विद्यार्थ्यांनी बिरसा मुंडा, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्याकडून प्रेरणा घेऊन कार्य करावे.
श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री मानसिंग बोंद्रे दादा यांचे या उपक्रमास मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाले स्वागत प्रास्ताविक डॉ. शिवाजी रायजादे यांनी केले. यावेळी प्रबंधक रवींद्र भोसले, अधीक्षक मनीष भोसले, आय क्यू एस सी समन्वयक डॉ आर डी मांडणीकर, डॉ.ए.बी.बलुगडे,डॉ के एम देसाई, सर्व प्राध्यापक, प्रशासकीय सहकारी विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.