कबनूर ः दिपक पाटील
दि १० जानेवारी 2021 -22 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परिक्षेत मणेरे हायस्कूल ची विद्यार्थिनी कु. प्रणीता सुधीर चौगुले हिने कोल्हापूर जिल्ह्यात 115 वा क्रमांक पटकविला व ती जिल्हा गुणवत्ता शिष्यवृत्तीधारक ठरली. तिला शाळेतील सर्व शिक्षक –शिक्षिका यांचे मार्गदर्शन लाभले. श्री.डी.ए.मणेरे चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक मा.श्री.सुधाकरराव मणेरे(काका) व ट्रस्ट चे उपाध्यक्ष मा श्री.केटकाळे (काका) यांनी यशस्वी विद्यार्थिनीचे अभिनंदन केले. मणेरे हायस्कूल व ज्यूनिअर कॉलेज च्या प्राचार्या सौ.माने उर्मिला यांनी ही तिचे कौतुक केले.