कडवईच्या फिटनेस वर्ल्ड जिमचे जिल्हास्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धेत यश

कडवई : सचिन पोटाळे

दि १३ जानेवारी खेर्डी येथे पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद शरीरसौष्ठव स्पर्धेत मैत्री सामाजिक संस्थेद्वारा चालविण्यात येणाऱ्या फिटनेस वर्ल्ड जिमने कौतुकास्पद कामगिरी बजावली. या स्पर्धेत जिमचे दोन सदस्य किशोर गटात सहभागी झाले होते.किशोर श्री.गट क्र १ मध्ये तेजस काशिनाथ उजगावकर याने चतुर्थ क्रमांक प्राप्त केला तर गट क्र २ मध्ये कमलेश भिकाजी पाटील याने तृतीय क्रमांक पटकावला.

कमलेश पाटील याची २४ जानेवारीला औरंगाबाद येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.त्यांच्या या यशाबद्दल पंचक्रोशीतून अभिनंदन करण्यात येत आहे.
या स्पर्धेसाठी त्याला प्रशिक्षक मिलिंद कडवईकर सर व क्रीडाशिक्षक संतोष साळुंके सर यांचे मार्गदर्शन लाभले.संस्थेचे अध्यक्ष महेश जाधव,सदस्य अक्षय यादव,केतन ओकटे यांचेदेखील सहकार्य मिळाले.