यड्रावच्या पोलिस पाटलासह शहापूर पोलिस ठाण्यातील पोलिस कॉन्टेबल ए.सी.बीच्या जाळ्यात

अटक वॉरंटमध्ये सहकार्य करण्यासाठी मागितली होती २ हजाराची लाच

इचलकरंजी:विजय मकोटे

दि:४ फेबुवारी आत्याच्या नावे निघालेल्या वॉरंटमध्ये अटक टाळण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागितल्या प्रकरणी शहापूर (इचलकरंजी) पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल आसिफ नसरूद्दिन सिराज भाई (वय 40, रा. यड्राव) व पोलीस पाटील जगदीश भूपाल संकपाळ (रा. यड्राव, ता. शिरोळ) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. कॉन्स्टेबल सिराज भाई पसार झाला पोलिस त्याचा शोध घेत आहेत सू त्याचा मोबाईल कवरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचा संदेश मिळत आहे , पोलीस पाटील जगदीश संकपाळ याला शुक्रवारी सकाळी अटक करण्यात आले आहे 

कर्तव्यदक्ष पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. गेल्या एक महिन्यात कोल्हापूर पोलिस दलातील चार पोलीस तीन ट्रॅप मध्ये सापडले आहेत. आठवड्यापूर्वी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील विजय कारंडे आणि किरण गावडे हे दोघे दहा लाखांची लाच घेताना रंगेहात सापडले होते. आता त्यापाठोपाठ शहापूर पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबल आसिफ सिराजभाई याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने कोल्हापूर पोलीस दलामध्ये एकच खळबळ उडाली आहे.