आरवली:- सचिन पाटोळे
गडनदी प्रकल्पा वरील पुनर्वसन गावठाणातील शिर्केवाडी ग्रामस्थांना पाठबंधारे विभागाच्या कृपेने आठ दिवस पाणीपुरवठा होत नसल्याने ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
शिर्केवाडीतील ग्रा पं सदस्य प्रशांत शिर्के व वाडीतील ग्रामस्थ सतत आठ दिवस पाठबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन भेट घेऊन व संपर्कही केला असता नेहमीच काहिनाकाहि कारण देत उद्या येऊ असे उत्तर देत असतात.
पाठबंधारे विभागाने शिर्केवाडीसाठी दीलेली पाण्याची पाईप लाईन दरवर्षी लिकेज होते तरीही इतक्या वर्षात कायमस्वरूपी मार्ग काढला जात नाही.