इचलकरंजी :प्रतिनिधी
दि: २५ फेब्रुवारी येथील गावभागात असलेल्या अंगणवाडीतील विद्यार्थी-विर्द्यार्थीनींना आदिनाथ दिगंबर जैन मंदिर यांच्यावतीने आरोग्यवर्धक साहित्य प्रदान करण्यात आले. माजी नगरसेवक अहमद मुजावर, एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योती पाटील यांच्या हस्ते या साहित्याचे वाटप करण्यात आले.
आदिनाथ दिगंबर जैन मंदिराच्यावतीने सतत सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. त्याच अनुषंगाने गावभागातील अंगणवाडीमधील बालचमूंना आरोग्यवर्धक साहित्य देण्यात आले. यावेळी दिगंबर जैन मंदिराचे सेक्रेटरी संजय मगदूम, खजिनदार मोहन चौगुले, राजू उपाध्ये तसेच सुपरवायझर शारदा जाधव, अंगणवाडी सेविका रुपाली चौगुले, मदतनीस हसिना मुजावर आदींसह विद्यार्थी-विद्यार्थीनी उपस्थित होते.