संगमेश्वर:-साद्दीक नाईकोडी
गेल्या काही दिवसांत वातावरण बदलू लागले असून उन्हाचा कडाका वाढलेला आहे.दिवस कडकडीत ऊन आणि रात्री गारवा या विचित्र हवामानाचा फटका आंबा पिकाला बसताना दिसत आहे.
दिवसा ऊन आणि रात्री गारवा या परिस्थितीचा फटका आंबा कैरीला बसलेला दिसून येत आहे. उष्म्यामुळे कैरी भाजून तिची गळ होत आहे. त्यामुळे शेवटच्या टप्प्यातून अपेक्षित उत्पादन मिळेल, या आशेने बघणाऱ्या बागायतदाराची चिंता वाढली आहे. यंदाच्या हंगामात उत्पादनात मोठी घट होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे.