महाशिवरात्री निमित्त पंचगंगा नदीतीरावरील महादेव मंदीरातील स्वामींच्या कुटुंबाला कृतज्ञता निधी प्रदान

इचलकरंजी : विजय मकोटे

दि. ०१ मार्चः पंचगंगा नदीतीरावरील वसलेले पुरातन काळातील महादेव मंदीरामध्ये गेली १० वर्षाहून अधिक नित्यनियमाने सेवा करणारे कै. रामया स्वामी यांचे दुखःद निधन झाले आहे. यावेळी त्यांच्या कुटुंबीयातील करता पुरुष गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांवर दुखाःचा डोंगर कोसळला आहे. महापूर व कोवीडच्या काळात देखील त्यांनी मंदीराची सेवा देखाभाल केली. सदर महादेव मंदीराची दररोज स्वच्छता करुन तेथील अखंडपणे सेवा केली त्यांच्या पश्‍चात त्यांच्या कुटुंबीयाकडून दररोज महादेव मंदीराची सेवा होत आहे.
त्यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या सेवेची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दररोज पोहायला येणा-या वरदविनायक पंचगंगा जलतरण मंडळाच्या सर्व सदस्यांनी व शिवभक्तांनी सामाजिक बांधिलकी जपत जेवढे शक्य आहे तेवढा निधी संकलन केला व हा निधी बुलढाणा अर्बन क्रेडीट सोसायटी मध्ये ठेवून स्वामींच्या कुटुंबीयांना महाशिवरात्रीचे औचित्य साधत ठेवरुपी मदत प्रदान करण्यात आली. सदर ठेव राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य मदन कारंडे व इचलकरंजीतील उदयोगपती अजित पवार यांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबीयांकडे सुपुर्द करण्यात आली.
सदर कार्यक्रम महाशिवरात्री निमित्त पंचगंगातिरी महादेव मंदीरामध्ये घेण्यात आला कार्यक्रमाचे सुत्रसंचालन किरण लंगोटे यांनी केले तर सदर कार्यक्रमासाठी पंचगंगा जलतरण मंडळाचे नंदू पाटील, आनंदा पेटकर, विजय चव्हाण, विठ्ठल येसाटे, मिलींद पवार, दिलीप बजाज, लक्ष्मण गणपते, प्रविण आंबी, संजय शेलार, अतुल सुस्वरे, सतीश सुतार, गुंडू सुतार, राजेंद्र पाटील, अनिल माळी, यांच्यासह पंचगंगा वरद विनायक मंडळाचे सर्व सदस्य व सिंधी समाजाचे सर्व सदस्य उपस्थित होते.