14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने पटकावला प्रथम क्रमांक

इचलकरंजी:प्रतिनिधी

दि. २३ येथील शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय 14 वर्षांखालील गटातील मुलांच्या खो-खो स्पर्धेत इलेव्हन संघाने प्रथम क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले.शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाच्या वतीने आमदार प्रकाश आवाडे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत दोन दिवसीय जिल्हास्तरीय मुलांच्या खो-खो स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, शैलेश गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चंद्रकांत कोपार्डे, क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे, प्रितम चौगुले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते. स्पर्धा पाहण्यासाठी खेळाडू व क्रीडा शौकिनांनी गर्दी केली होती.
या स्पर्धेत इलेव्हन संघाने प्रथम, सरस्वती संघाने व्दितीय, शिव छत्रपती संघाने तृतीय व जयहिंद संघाने चतुर्थ क्रमांक पटकावला. उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या खेळाडूंना कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद बचाटे, अक्षय मालपाणी, अनिकेत पाटील, गजानन लोंढे, शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाचे अध्यक्ष किरण दंडगे यांच्या हस्ते बक्षीसे देण्यात आली.
स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून संभाजी बंडगर, मंदार कुलकर्णी, अण्णा कुंडले, अक्षय तारदाळे, मदन शेट्टी, सोमनाथ कोले यांनी काम पाहिले. स्पर्धा यशस्वीसाठी शिव छत्रपती खो-खो क्रीडा संघाचे कार्याध्यक्ष अशोक कुकडे, प्रितम चौगुले, मदन शेट्टी, स्वप्नील पोळ, आकाश नायकल, निलेश जाधव, कल्पेश दंडगे, भैय्या इंगवले, अवधूत यादव, सुदाम साळुंखे यांच्यासह संघाचे पदाधिकारी व खेळाडूंनी परिश्रम घेतले.