रत्नागिरी: प्रतिनिधी
दि.१९ एप्रिल रत्नागिरीतील उद्यम नगर परिसरातील एका महिलेने काल दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास गळफास लावून आत्महत्या सायमा केली. सायमा समीर सोलकर, वय २६ , सध्या राहणार घरोंदा अपार्टमेंट रू.नंबर २०३ ,राजापूरकर कॉलनी ,उद्यमनगर ता .जि.रत्नागिरी. असे तिचे नाव आहे.
घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की तिने बेडरूम मध्ये स्टीलच्या टाकीवर चढून नायलॉन दोरी सीलिंगला बांधून दुसऱ्या बाजूने गळ्यात फास बांधून खाली उडी मारली . दोरीची गाठ गळ्याला घट्ट बसल्याने त्यात ती मयत झाली आहे तिने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समजू शकले नाही . पोलिस तपास सुरू आहे.