इचलकरंजी: विजय मकोटे
दि.२४ एप्रिल:श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल-ज्युनिअर कॉलेज इचलकरंजी येथे जागतिक पुस्तक दिन साजरा करण्यात आला.जागतिक कीर्तीचे थोर इंग्रजी लेखक, कवी,नाटककार विल्यम शेक्सपिअर यांची जयंती व पुण्यतिथी 23 एप्रिल हा पुस्तक दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने प्रशालेत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात अध्यक्ष स्थानी प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया गोंदकर होत्या.
यावेळी विविध ग्रंथाचे रसग्रहण करणेत आले. श्रीमती सुप्रिया गोंदकर यांनी प्रसिद्ध इंग्रजी लेखक रॉनडा बर्न यांच्या ‘सिक्रेट ने कसे बदलले माझे जीवन’ या पुस्तकाचे रसग्रहण केले.यावेळी बोलताना त्या म्हणाल्या,”भौतिक सुविधा मिळवल्यानंतर आपण कसे जगावे”हा या पुस्तकातून संदेश दिला आहे.समाजाचे मानसशास्त्र पुस्तक वाचनातून समजते.शाळेचे ग्रंथालय समृद्ध असेल तर शाळा समृद्ध होते.शाळेचे प्रतिबिंब ग्रंथालयातून दिसून येते.असे प्रतिपादन त्यांनी केले .
क्रीडाशिक्षक प्रा.शेखर शहा यांनी भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या “प्लेयिंग ईट माय वे”या पुस्तकाचे रसग्रहण केले.प्रशालेच्या ग्रंथपाल सौ.एस. एस.नेजे यांनी मराठी लेखक अरविंद जगताप यांच्या “पत्रास कारण की”या पुस्तकाचे रसग्रहण केले.
कार्यक्रमाचे स्वागत-प्रास्तविक ग्रंथपाल सौ.एस. एस.नेजे यांनी केले.यावेळी प्रा.ए. एम.सावंत यांचा सेवानिवृत्ती निमित्ताने सपत्नीक सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमावेळी उपप्राचार्य आर.एस.पाटील,उपमुख्याध्यापिका सौ.एस.एस. भस्मे, पर्यवेक्षक श्री.व्ही.एन.कांबळे,क्रीडा शिक्षक प्रा.शेखर शहा आणि प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षिका उपस्थित होते.