इचलकरंजी: चंदुलाल फकीर
दि.२६ एप्रिल कबनूर येथील गंगानगर स्पोर्ट्स गंगानगर
योजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक मधील झालेल्या अंतिम सामना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज संघ व सुभेदार तानाजी मालुसरे यांच्यात पार पडला . या सामन्याचे नाणेफेक माजी.सरपंच उदय गीते यांच्या हस्ते तर बक्षीस वितरण माजी उपसरपंच निलेश पाटील यांच्या हस्ते झाले या सामन्यात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चषक विजेता संघ वीर शिवा काशीद ठरला तर उप विजेता संघ सुभेदार तानाजी मालुसरे झाला
यावेळी सर्व माजी खेळाडू चे सत्कार करण्यात आला .यावेळी राजू मुल्ला, शिवाजी चव्हाण,रियाज चिकोड्डे,सुशांत हवले, नितीन गवळी,राजू भूउगडे, सागर शिंदे,संदीप चव्हाण,रोहित परिट,सचिन माळी,नंदू माळी,विकास कदम,रावजी कोडेकर,दिपक बनन्नावर ,आनंद दौड, बाळू पाटील,सचिन लोहार,अनंता पोवार,दगडू दूधने,अनिल जमदाडे,बाळू पोटे व असंख्य क्रिकेट प्रेमी उपस्थित होते.
अंतिम सामन्यातील प्रक्षणिय अटीतटी लडतीचा मनमुराद आनंद मा. सरपंच उदय गिते मा. डे.सरपंच निलेश पाटील व बहुसंख्य गंगानगर परीसरातील ग्रामस्थ, तरूण युवकांनी अनुभवला.
सदर स्पर्धचे निटनेटके आयोजन पाहून काही मान्यवरांनी अशा प्रकारची मोठी स्पर्धा भरवून भागातील खेळाडूना प्रोत्साहन द्यावेे असे सुचीत केेले.