जैनापूर,
ता.27 जैनापुर येथील शरद कृषी महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत व उमळवाड प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत हिवताप, चिकनगुनिया, डेंगु या आजाराची लक्षणे, बचाव व उपाय याबद्दल जनजागृती करण्यात आली.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन डोने यांनी डासांमुळे होणाऱ्या आजारावर निश्चित उपचार नाही. रुग्णांच्या प्रतिकारशक्तीवर उपचार ठरतो. वेळेत उपचार नाही झाला तर मृत्यू होऊ शकतो व उपचार अर्धवट सोडला तर पुन्हा कालांतराने हा आजार होऊ शकतो अशी माहिती दिली. तसेच या उपचारावरील बचाव करण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. कुंडीमध्ये, कुंडीच्या खाली प्लेटमध्ये, फ्रिजमधील मागील बाजूस तसेच घराच्या छतावर पाणी साठून राहिलेस यामध्ये डासाची उत्पती होते. ते मलेरिया, हिवतापसारख्या आजारास कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा ठिकाणी खूप दिवस पाणीसाठणार नाही याची काळजी घ्यावी. आरोग्य विभागाकडून दिल्या जाणा-या मार्गदर्शनाचा अवलंबण करावे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बाहुबली माणगावे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. दादासाहेब मगदूम तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन डोणे, महेश कदम, संतोष औंधकर, प्रयोगशाळा सहाय्यक श्रीमती एस एस पाटील, आरोग्य सेवक प्रकाश वरुटे, प्रशांत कांबळे, किरण कळसन्नावर व सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो ओळ- जैनापूर येथील शरद कृषी महाविद्यालयामध्ये हिवताप, चिकनगुनिया, डेंगु या आजावरील उपाय योजना याची माहिती देताना वैद्यकीय अधिकारी.