संगमेश्वर : नियाज खान
दि. ३० एप्रिल :संगमेश्वर तालुका शेतकरी लाकूड व्यापारी संघटनेमार्फत ५०० वटवृक्षाच्या लागवडीचा संकल्प करण्यात आला आहे.वटवृक्षाला हिंदू धर्मात अनन्य साधारण महत्व असून अनेक औषधी गुणधर्माचा त्यात समावेश आहे.
वटवृक्षांची लागवड करून संवर्धनाची जबाबदारी संघटनेने स्वीकारली आहे. वटवृक्ष हा भारतीय संस्कृतीचा एक भाग आहे. या वृक्षाची पाने, खोड, फांद्यामध्ये औषधी गुणधर्म सामावलेले आहेत. मानवाला जीवनासाठी ऑक्सिजन महत्वाचा असून वटवृक्ष प्राणवायू देतो.
थंडीमध्ये वटवृक्षामार्फत उष्णता तर उन्हाळ्यामध्ये शीतलता देण्याचे काम केले जाते. संघटनेचे अध्यक्ष किरण जाधव यांनी ही बाब आपल्या सहकार्यांसमोर ठेवली. नियमित पावसाला सुरूवात होताच वटवृक्षाची ५०० झाडे संघटनेच्या माध्यमातून लावण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.