शिरोळ : विजय घंगेकर
दि. २ मे धरणगुत्ती येथील धरणगुत्ती विकास सेवासोसायटीच्या संचालक मंडळाची नुकतीच बिनविरोध निवडणूक झालेली होती. यामध्ये धरणगुत्ती गावचे माजी सरपंच व दत्त कारखान्याचे संचालक यांच्या नेतृत्त्वाखाली पॅनेल बिनविरोध निवडून आलेले होते. या संस्थेच्या चेअरमन व व्हाईस चेअरम पदाच्या निवडणूकीसाठी आज संस्थेच्या कार्यालयात आज नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये चेअरमन म्हणून शेखर पाटील व व्हाईस चेअरमन म्हणून संजय रजपूत यांची एकमताने निवड झाली. या निवडी नंतर दत्त कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतरावपाटील यांनी पुष्पगुच्छ देवून चेअरमन व व्हाईस चेअरमन यांचे अभिनंदन केले या प्रसंगी नांदणी बँकेचे संचालक मलगोंडा पाटील, उद्योजक मनोहर माळी, ग्रामपंचायत सदस्य भालचंद्र लंगरे, राहुल मिस्त्री व नवनिर्वाचित संचालक उपस्थित होते.