आयकॉनिक लेडी सुपरस्टार पद्मश्री माधुरी दिक्षीत-नेने बनल्या चकोते ग्रुपच्या ब्रँड अँबेसिडर…

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि. ३० एप्रिल सुप्रसिद्ध अभिनेत्री माधुरी दिक्षीत-नेने या चकोते ग्रुपच्याब्रँड अँबेसिडर झाल्या.खाद्य संस्कृतीविषयी आवड मुळातच असल्याने मी नेहमीच त्याकडे आकर्षित होते.तसेच चकोते ग्रुपचा थक्क करणारा प्रवासाने मी प्रभावीत झाले असे वक्तव्य त्यांनी केले.

बदलत्या शतकाच्या उंबरठ्यावर उभे राहून देशविदेशातील नवनविन तंत्रज्ञान, हायजेनिकप्रॉडक्ट, अत्याधुनिक सुविधांसह भारतातील आयडियल प्रकल्पाच्या माध्यमातुन चकोते ग्रुपचे उद्योगजगतात दमदार पाऊल टाकत आहे. केवळ विक्री नफा वितरण, उत्पादन याच गोष्टींवर आघाडीवर न राहता ग्राहकांच्या बदलत्या गरजेनुसार उत्पादने, पॅकेजिंग, किंमत, जाहिरात यामध्ये ते बदल करत आहेत.पुन्हा एकदा ब्रॅण्डच्या स्वरुपात पारंपारीक चवीची उत्पादने अत्याधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करून देण्यासाठी अण्णासाहेब सरसावले आहेत. भविष्यातील उतुंग व विशाल यशाची पायाभरणी त्या प्रकल्पाच्या माध्यमातून ते करत आहेत.

आपल्या दमदार अभिनय, नृत्यकौशल्य व मोहक हास्याने लाखो मनावर अजून ही अधिराज्य गाजवणाऱ्या माधुरी दिक्षीत नेने यांचे सोबत आमच्या ब्रँड सहयोगाची घोषणा करताना खूप आनंद होत आहे, त्यांनी अथक मेहनत व सर्वोत्तमेच्या माध्यमातून आपले नाव अग्रस्थानावर नेले असल्याने आमच्या ब्रँडसाठी तीच परीपूर्ण निवड आहे असे श्री. आण्णासाहेब चकोते म्हणाले.