गोकुळ मार्फत राजर्षी छञपती शाहू महाराज यांना आदरांजली

कोल्‍हापूर : प्रतिनिधी

दि. ०६ मे .आपल्या सर्वाचे भाग्यविधाते आणी ज्यांनी सर्व उपेक्षित दिनदलित घटकांच्या उन्नतीसाठी व उद्धारासाठी दिशा दिली. त्या राजर्षी छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त कृतज्ञता पर्व म्हणून साजरे करण्यात आले असून त्यासाठी आज सकाळी 10 वाजता गोकुळच्‍या ताराबाई पार्क  येथे १०० सेकंद स्तब्ध राहून कृतज्ञता पूर्वक आदरांजली वाहून छ.शाहू शताब्दी निमित्ताने राजानां मानवंदना केली.यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व संचालकसो यांच्‍या उपस्थितीत ताराबाई पार्क येथे राजर्षी छ.शाहू महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन करण्‍यात आले.

तसेच गोकुळच्‍या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव, गोगवे चि‍लींग सेंटर, गडहिंग्‍लज चिलींग सेंटर, बिद्री चिलींग सेंटर,शिरोळ चिलींग सेंटर, तावरेवाडी चिलींग सेंटर,महालक्ष्‍मी पशुखाद्य कारखाना कागल,मुडशिंगी पशुखाद्य कारखाना,  यासर्वठिकाणी  आदरांजली वाहण्‍यात आली.

          यावेळी बोलताना श्री. पाटील म्‍हणाले आपल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आपल्या कार्यातून सामाजिक क्रांती घडवून आणली महाराजांनी घेतलेले अनेक क्रांतिकारक निर्णय व कल्याणकारी हुकूम आजही समाजाला मार्गदर्शक आहेत. त्यांच्या कल्पनेतून साकारलेले  राधानगरी धरणामुळे कोल्हापूर जिल्ह्यात हरितक्रांती व समृद्धीची बीजे रोवली  गेली. त्यांचे विचार आम्हाला  प्रेणादायी आहेत असे मनोगत व्यक्त केले.

          यावेळी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील व जेष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, बाबासाहेब चौगले,  शशिकांत पाटील, संचालिकाअंजना रेडेकर कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, व्‍यवस्‍थापक पशुसंवर्धन डॉ.यु.व्‍ही.मोगले, संकलन व्‍यवस्‍थापक एस.व्‍ही. तुंरबेकर, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.