इचलकरंजी :. विजय मकोटे
दि. १८ मे. नेलमंगला बेेंगलोर येथे श्री गायत्री पिठ संस्थान हम्पीचे श्री श्री श्री दयानंदपुरी महास्वामीजी यांच्या ट्रस्टतर्फे राष्ट्रीय देवांग मठाच्या माध्यमातून अनेक शैक्षणिक, सामाजिक व संस्कृतीक उपक्रम सुरू आहेत. स्वामीजींच्या या कार्यास थोडासा हातभार लागावा या उद्देशाने महाराष्ट्र कोष्टी समाज सेवा मंडळ मुंबई या संस्थेतर्फे मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते यांचे हस्ते 51 हजार रुपयांचा चेक देणेत आला. तसेच ट्रस्टी उत्तमराव म्हेत्रे यांचे हस्ते 51 हजाराचा चेक देणेत आला.
स्वामीजींच्या ट्रस्टतर्फे सुरु असलेल्या उपक्रमांचा उद्घाटन समारंभ कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमाई यांच्या हस्ते बेंगलोर येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास देशाच्या विविध भागातून हजारो समाजबांधव जमले होते.
यावेळी देवांग समाजाचे नेते अरुणराव वरोडे, महासचिव रामचंद्र निमणकर, सचिव मिलिंद कांबळे, डॉ. अनिल कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते. स्वामीजींनी मंडळाच्या कार्याचे कौतुक करून आशीर्वाद दिले. तसेच छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर येथे कोष्टी समाजास बोर्डींगसाठी जागा दिली आहे. तेथे समाजबांधवांनी बोर्डींग बांधली असूनत त्यास शंभर वर्ष झाली. त्याचा शतकमहोत्सव समारंभ संपन्न झाला त्यानिमित कोल्हापूर कोष्टी समाज मंडळास 15 हजार रुपयांची आर्थिक मदत देणेत आली.
यापूर्वी मंडळातर्फे श्री चौंडेश्वरी कोष्टी समाज न्यास बार्शी या संस्थेस देवांग कोष्टी समाज पुणे, देवांग कोष्टी समाज इचलकरंजी, देवांग कोष्टी समाज चौंडेश्वरी बहुउद्देशीय सेवा संस्था सांगोला, युवा फाउंडेशन इचलकरंजी, वडगांव वधु-वर मेळावा तसेच रामलिंग चौंडेश्वरी बहुद्देशीय संस्था इचलकरंजी इत्यादी संस्थाना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतीक व धार्मिक कार्यासाठी प्रोत्साहन म्हणून मंडळाचे अध्यक्ष प्रकाशराव सातपुते, कार्याध्यक्ष प्रकाशशेठ कांबळे, ट्रस्टी अंकुशराव उकार्डे, ट्रस्टी अरविंद तापोळे, उत्तम म्हेत्रे, खजिनदार विश्वनाथ पोयेकर, महासचिव रामचंद्र निमणकर आदींच्या सहकार्याने मदत देण्यात आली आहे.