कबनूर : चंदुलाल फकीर
दि. १९ मे :कबनूर नगरपरिषद कृती समितीच्या शिष्टमंडळाने मुंबई मंत्रालय येथे राज्याचे नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेतली. यावेळी शिष्टमंडळाने मंत्री तनपुरे यांच्याशी कबनूर नगरपरिषद होणे बाबत विविध समस्यांची संपूर्ण माहिती त्यांच्यासमोर मांडली गावातील युवक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा लढा उभा केला आहे. यापूर्वी कबनूर नगरपरिषद होणे बाबत आमदार, खासदार, मंत्री महोदय,अधिकारी यांच्याशी भेट घेऊन त्यांना याबाबत निवेदन देण्यात येऊन चर्चाही घडवून आणली आहे.आपण स्वतः यामध्ये लक्ष घालून अनेक वर्षे प्रलंबित असलेला प्रश्न सोडवून कबनूर नगरपरिषदेची घोषणा करावी अशी मागणी शिष्टमंडळाने मंत्री महोदयांना केली मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन कबनूर नगरपरिषद बाबत संपूर्ण कामकाजाची माहिती घेऊन नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बैठक घडवून आणण्याचे आश्वासन नगरपरिषद कृती समितीला दिले. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दत्ता शिंदे, माजी उपसरपंच निलेश पाटील, अजित खूडे, विकास फडतारे, मेहबूब मुल्ला,नितीन गवळी, शकील मुल्ला ,रवींद्र धनगर, उत्तम जाधव, सतीश पाटील आदी उपस्थित होते.