कडवई: – नियाझ खान
मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ च्या चौपदरीकरण काम जोरात चालू आहे. तुरळ ते शिंदे आंबेरी रस्त्याचे एका बाजूचे काम जवळपास पुर्ण झाले आहे तसेच या रस्त्यावरुन वाहतूक सुरू आहे.
रस्त्यावरून वाहतूक सुरू होऊन १५ ते २० दिवसांच्या काळातच या रस्त्यावर खड्डा पडलेला दिसत आहे. यावरुन या रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह उपस्थित केला जात आहे. या रस्त्याच्या कामाकडे संबंधीत खात्याच्या अधिकारी वर्गाने तसेच लोकप्रतिनिधीनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे सुरुवातीलाच जर असे रस्त्याला खड्डे पडत असतील तर रस्त्याच्या कामाच्या गुणवत्तेवर शंका निर्माण करणे साहजिकच आहे.