गटई कामगारांनी पत्र्याच्या स्टॉलसाठी अर्ज करावेत

सहायक आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर : प्रतिनिधी

दि. २६ मे.राज्यामध्ये पादत्राणे दुरुस्त करणारे व्यवसायिक हे रस्त्याच्या कडेला बसूनआपली सेवा देत असतात. या व्यवसायिकांना वारा, ऊन,पाऊस यापासून संरक्षण मिळावे तसेच त्याची आर्थिक उन्नतीव्हावी यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत 100  टक्के शासकीय अनूदानावर गटई कामगारांना लोखंडी पत्र्याचे स्टॉलपुरविणे योजना ग्रामपंचायत व अ,ब, क वर्ग नगरपालिकाआणि छावणी क्षेत्र व महानगरपालिका क्षेत्रात राबविण्याचानिर्णय सन 2007-2008 पासून शासनाने घेतलेला आहे. यायोजनेअंतर्गत गटई कामगारांना 100 टक्के अनुदानावरमोफत पत्र्याचा स्टॉल व रूपये 500 चे अनुदान दिले जाते.

                   इच्छूक अर्जदाराने विहीत नमून्यातील अर्जसहाय्यक आयुक्त समाज कल्याण, कोल्हापुर यांच्याकार्यालयातून विनामुल्य प्राप्त करून घ्यावेत व आवश्यक त्याप्रमाणपत्रांसह/कागदपत्रासह सादर करावेत.  तसेच यापूर्वीज्या कुटूंबाने या योजनेचा लाभ घेतलेला आहे त्यांनी अर्जकरू नयेत. अधिक माहितीसाठी व अर्जांसाठी सहाय्यकआयुक्त , समाज कल्याण, कोल्हापुर येथे (संपर्क क्र.0231-2651318) सपंर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्तविशाल लोंढे यांनी केले आहे.