शुध्द पेयजल प्रकल्पांचे मा. खासदार कल्लप्पाण्णा आवाडे व युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते उद्घाटन

इचलकरंजी : विजय मकोटे
 दि. १८ जून : आमदार प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्यातून वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत इचलकरंजी शहरातील नागरिकांना 24 तास शुध्द व मुबलक पाणी उपलब्ध व्हावे यासाठी मंजूर साईट नं. 102 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि आसरानगर ओपन स्पेस हनुमान मंदिर येथील शुध्द पेयजल प्रकल्पांचे उद्घाटन माजी खासदार कल्लप्पाण्णा आवाडे व युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आले. पाणीटंचाईच्या काळात पाण्याची सोय झाल्याने भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त होत आहे.
या शुध्द पेयजल प्रकल्पातून नागरिकांना एटीएएम कार्डच्या माध्यमातून दररोज शुध्द पाणी मिळणार आहे. या कार्ड संदर्भात सात्याने पाठपुरावा करत माजी नगरसेवक संजय केंगार यांनी ते नागरिकांपर्यंत पोहचविण्याचे काम केले.
शहरातील पाणीटंचाईचा निर्माण झालेला प्रश्‍न सोडवण्यासाठी व शहरवासियांना पाणी उपलब्ध व्हावे यासाठी आमदार प्रकाश आवाडे यांनी शासन स्तरावर पाठपुरावा करत वैशिष्ट्यपूर्ण योजना अंतर्गत शहरात 100 शुध्द पेयजल प्रकल्प मंजूर करुन त्यासाठी आवश्यक 4 कोटीचा निधीही उपलब्ध करुन दिला आहे. पाणीटंचाईचा प्रश्‍न भेडसावत असताना हा प्रकल्प उपयुक्त ठरत आहे. त्यापैकीच साईट नं. 102 डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि आसरानगर ओपन स्पेस हनुमान मंदिर येथील पेयजल प्रकल्पाचा शुभारंभ माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे आणि युवा नेते स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी काकासो नाडगे, मिट्टू सुरवसे, राजू कोरे, जितेंद्र मस्कर, शिवगोंडा खोत, जीवन कोळी, सचिन वरपे, प्रदीप दरीबे, रामा नाईक, चंद्रकांत चौगुले, पप्पू दास, यासीन आरकाटे, सिध्देश्‍वर माळकुटे, सतिश नगारे, निरज माछरे, अरविंद निकम, संदीप भडंगे, दत्ता हेगडे, मल्लू पाटील, गणेश भंडारे, तुळशीदास चव्हाण, अल्लाउद्दीन पडसलगी, कृष्णा लोहार, बंदेनवाज मोमीन, गोरख हात्तीकर, राजू होगाडे, परशुराम पाथरवट, शकिल मुरसळगी, सलीम पागेवाले, विलास भडंगे, विठ्ठल हात्तीकर, सुनिल हात्तीकर, मोहन आवळे, संतोष पोवार, सुमित माछरे, संजय धावरे, रमेश भागवत आदींसह भागातील महिला व नागरिक उपस्थित होते.