इचलकरंजी : विजय मकोटे
दि. २० जुलै :येथील रोटरीच्या आरसीसी क्लब ऑफ ईस्ट मँचेस्टर यड्राव यांच्या वतीने कॉलनीमध्ये स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत 75 रोपांचे वाटप आणि वृक्षारोपण न्यायाधीश एस. डी. वानखेडी व राकेश पाटील यांच्या तसेच रोटरीचे पदाधिकारी व रहिवाश्यांच्यावतीने वृक्षारोपण करण्यात आले.
ईस्ट मँचेस्टर कॉलनीचा परिसर वृक्षांनी बहरलेला असून विस्तारीत भागामध्ये वृक्ष लावण्यात आली. याप्रसंगी प्रकाशराव सातपुते, अॅड. दिग्विजय पाटील, विनोद काबरा, अरूण पाटील, निशीकांत मगदूम, संतोष पाटील, अभिषेक छप्रे, इरगोंडा पाटील, अनिल पोवार, विक्रम जाधव, बलराम सारडा, श्री. सातपुते, विजय पित्रोदा, बाबुभाई, श्री. तिवारी श्री.जोशी, देव पटेल, प्रदिप पाटील, अमित दोथी इत्यादी मान्यवरांनी वृक्षारोपण केले.
यावेळी राकेश पाटील यांनी, पावसाळ्यामध्ये वेगवेगळया प्रकारचे वृक्ष आणून लावले जातील. आणि सर्व वृक्षांचे योग्यरितीने संगोपन केले जाईल, असे अभिवचन दिले. सोसायटीमध्ये चाललेल्या विविध उपक्रमांबद्दल न्यायाधीश श्री. वानखेडी यांनी कौतुक केले. शेवटी अरूण पाटील यांनी आभार मानले.