हर घर तिरंगा मोहिमअंतर्गत साखरपा परिसरात प्रभातफेरी

जि. प. पद्मा कन्या शाळा यांचा उपक्रम

देवरूख : सचिन पाटोळे
दि. २३ जुले : आपला भारत देश यंदा ७५ वा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करत आहे.या अनुषंगाने शासनाकडून आझादी का अमृत महोत्सव हर घर तिरंगा ही मोहीम राबवली जात आहे.प्रत्येक नागरिकाने यात सहभागी व्हावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याच पाश्र्वभूमीवर जि. प पद्मा कन्या शाळा ,साखरपा यांच्यावतीने परिसरातून प्रभातफेरी काढण्यात आली.

यावेळी ढोलाच्या गजरात आझादी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त घोषणा देण्यात आल्या.तसेच घोषणा फलक तयार करण्यात आले होते.यावेळी शाळेचे मुख्याध्यापक संजय यादव,शिक्षक यशवंत घागरे,सौ.मांगले मॅडम,शिवाजी सुतार,महेश कांबळे,सुनील चौरे,सौ. बांडागळे आदी शिक्षक वर्ग,शाळेच्या सर्व विद्यार्थिनी या प्रभात फेरी मध्ये सहभागी झाल्या होत्या.