देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल जल्लोष

पारंपारिक वेशभूषा, वाद्यांचा गजर, देवी-देवतांचे पुजन, फटाक्यांची आतषबाजी करत आदिवासी फासे पारधी समाजभव्य विजयी मिरवणूक
इचलकरंजी : हबीब शेख
दि. २३ जुलै :पारंपारिक वेशभूषा, वाद्यांचा गजर, देवी-देवतांचे पुजन, फटाक्यांची आतषबाजी करत ताराराणी पक्ष आणि आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने देशाच्या राष्ट्रपतीपदी आदिवासी समाजातील महामहिम द्रौपदी मुर्मू यांच्या निवडीबद्दल जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी शिवतीर्थ ते कॉ. मलाबादे चौक मार्गावर भव्य विजयी मिरवणूक काढण्यासह साखर वाटण्यात आली. 
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतीपदासाठी आदिवासी भगिनीला संधी देऊन महिलांचा सन्मानच केला. त्याचबरोबर महामहिम द्रौपदी मुर्मू यांना प्रचंड मताधिक्क्यांनी विजयी करुन देशातील सर्वोच्चपदावर विराजमान केले. त्याबद्दल पंतप्रधान मा. मोदीजी तसेच सहकार्य केलेल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया आमदार प्रकाश आवाडे यांनी व्यक्त केली.

देशाच्या राष्ट्रपती म्हणून महामहिम द्रौपदी मुर्मू यांची गुरुवारी निवड जाहीर करण्यात आली. या विजयाप्रित्यर्थ इचलकरंजीत ताराराणी पक्ष व आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला. एनडीए च्या उमेदवार महामहिम द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्‍चित असल्याने दुपारपासूनच ताराराणी पक्ष कार्यालयाच्या प्रांगणात आदिवासी फासे पारधी समाजातील महिला, पुरुष तसेच लहान मुले व वृध्द मोठ्या संख्येने जमा झाले होते. याठिकाणी पारंपारिक वेशभूषा परिधान करुन वाद्यांच्या गजरात पारंपारिक नृत्य सादर करत जल्लोष करण्यात आला.
त्यानंतर शिवतीर्थ येथे ताराराणी पक्षाचे विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. राहुल आवाडे, कल्लाप्पाण्णा आवाडे जनता बँकेचे संचालक स्वप्निल आवाडे व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्‍वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी शिवतीर्थपासून कॉ. मलाबादे चौकापर्यंत वाद्यांच्या गजरात विजयी मिरवणूक काढली. चौकात आल्यानंतर साखर वाटण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी फासे पारधी समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मोहन काळे व सहकार्‍यांनी आदिवासी समाजातील देवी-देवतांची विधीवत पुजा केली. सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदासाठी आदिवासी भागातील महिलेचा विचार करून त्यांना संधी देणे हा महिलांचा सन्मान आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना न्याय दिल्याबद्दल  पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृह मंत्री अमित शहा, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे आभार मानतो, असे डॉ. राहुल आवाडे यांनी सांगितले.
याप्रसंगी प्रकाश मोरे, अहमद मुजावर, बाळासाहेब कलागते, अरुण आवळे, सर्जेराव पाटील, महावीर कुरुंदवाडे, शेखर शहा, नरसिंह पारीक, संजय केंगार, राजेंद्र बचाटे, राजू माळी, नारायण दुरुगडे, नितेश पोवार, सचिन हेरवाडे, राजाराम बोंगार्डे, राजू माळी, प्रविण केसरे, रमेश पाटील, अनिल शिकलगार, मल्लू चव्हाण, गणपती काळे, शंकर चव्हाण, विलास चव्हाण, जीवा चव्हाण, लिंगाप्पा चव्हाण, सुरेश काळे, आप्पा चव्हाण, सुभाष चव्हाण, गोपाळ काळे, प्रकाश काळे, रामा काळे, शिकलगार चव्हाण, वसंत काळे, सुभाष काळे, सौ. अश्‍विनी काळे, मंगल चव्हाण, शांता चव्हाण, राजेश्री चव्हाण, अंजू चव्हाण, लैला चव्हाण, आशा चव्हाण, बेबी काळे, सारीका काळे, जानकी काळे, कल्पना चव्हाण, सुजाता चव्हाण, गंगा चव्हाण, सावंत चव्हाण, ज्ञानु काळे, अमित चव्हाण, कुमार पलंगे, रंगा लाखे, शांताराम लाखे, नौशाद जावळे, संजय आरेकर, श्रीशै, बिळ्ळुर, राजू गिरी, स्वप्निल पाटील, विजय चव्हाण आदी उपस्थित होते.