सहकार भारती, कोल्हापूरतर्फे अंशदान परिपत्रक रद्द करणेबाबत दिले निवेदन

इचलकरंजीविजय मकोटे

दि. ११ ऑगस्ट :सहकारामध्ये कार्यरत असणाऱ्या सहकार भारतीचा संस्थेच्या पदाधिकारी व हातकणंगले तालुक्यातील पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी मा. उप-निबंधकसो, हातकणंगले तालुका यांची भेट घेऊन अंशदानसंबधी विचार-विनिमय करून अंशदान भरण्यासाठी सहकारी संस्थांना सक्ती करू नये, अशा आशयाचे निवेदन देण्यात आले त्याप्रसंगी सहकार भारतीचे कोल्हापुर जिल्हा प्रमुख – श्री जवाहरजी छाबडा, बालाजी पत संस्थेचे अध्यक्ष – मदन कारंडे , विश्वमिञ पत संस्थेचे अध्यक्ष अशोकराव जाधव, समर्थ पतसंस्थेचे संचालक प्रमोद मिराशी , सेक्रेटरी हेमंत उपाध्ये, आर्य चाणक्य पतसंस्थेचे संचालक सुकूमार देवमोरे तसेच इतर पतसंस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.