कोल्हापूर : प्रतिनिधी
दि. 13 ऑगस्ट : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व कोल्हापूर विमानतळ प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने विमानतळ परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळीराज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खासदार धनंजय महाडिक, आमदार प्रकाश अबीटकर, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी राहुल रेखावर, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे उपस्थित होते. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षानिमित्त या ठिकाणी ७५ झाडे लावण्यात आली.
कार्यक्रमासाठी ऑलम्पिकवीर बंडा पाटील रेटरेकर(कुस्ती), अर्जुनवीर श्रीमती शैलेजा साळोखे (टेबल टेनिस), अर्जुनवीर ऑलम्पियन तेजस्वीनी सावंत (नेमबाजी), अंतरराष्ट्रीय नेमबाज सचिन चव्हाण, शाहु माने, अनुष्का पाटील, अंतरराष्ट्रीय कुस्ती खेळाडू संभाजी पाटील कोपार्डेकर, सोनबा गोंगाने, वैभव पाटील, रेश्मा माने तसेच विम्बल्डन खेळाडू ऐश्वर्या जाधव, फुटबॉल खेळाडू ऋषीकेश मेथे-पाटील, संकेत साळोखे, पवन माळी, अंतरराष्ट्रीय हॉकी खेळाडू ऎश्वर्या चव्हाण, पंच श्वेता पाटील व रमा पोतनिस तसेच खेलो इंडिया कुस्ती सेंटर व क्रीडा प्रबोधिनीचे खेळाडू उपस्थित होते. या खेळाडूंचे स्वागत करून प्रत्येकाच्या हस्ते एक झाड विमानतळ परिसरात लावण्यात आले.
उपसंचालक संजय सबनीस यांनी आपण कष्टाच्या मेहनतीच्या बळावर या विमानतळावरून अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जावे व जाताना आपण लावलेले झाड आपल्यासाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे सांगितले.
तेजस्वीनी सावंत व जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे य़ांनी मार्गदर्शन करून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कोल्हापूर विमानतळ प्राधिकरणाचे व्यवस्थापक कमल कटारिया यांनी या कोल्हापूर मध्ये एवढे मोठे खेळाडू असून या कोल्हापूरमध्ये विमानतळाच्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याची संधी मिळत असल्याने आनंद व्यक्त करत खेळाडूंनी आपण लावलेल्या झाडाची निगा राखण्यासाठी प्राधिकरण आपल्या सोबत कायम असेल असे अश्वासन दिले.
कार्यक्रमाचे सुत्र संचालन शिवाजी पाटील यांनी तर आभार क्रीडा अधिकारी बालाजी बरबडे यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभागातील तालुका क्रीडा अधिकारी सचिन चव्हाण, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, रोहिणी मोकाशी, प्रविण कोंडावळे, सुरेश भोसले, कृष्णात पाटील, संदीप जाधव यांनी पारिश्रम घेतले.