संगमेश्वर:
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देवरुख नगरपंचायत देवरूख यांच्या वतीने मराठी भाषेत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये पैसाफंड हायस्कूल व ज्युनियर कॉलेज संगमेश्वरच्या शिक्षिका श्रध्दा शिवराम जोशी यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे.
देवरुख नंगरपंचायतीच्या वतीने घेण्यात आलेल्या या स्पर्धेमध्ये एकूण १८० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ही निबंध स्पर्धा मराठी भाषेत ठेवण्यात आली होती. स्पर्धेमध्ये निबंधाचे चार विषय देण्यात आले होते.(१)- भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे काय कमवलेॽकाय गमवलेॽ(२)-भारतीय स्वातंत्र लढा (३)-झिरो प्लास्टिक राष्ट्र(४)-भारतीय संस्कृती आणि विज्ञान या विषयावर निबंध तयार करायचे होते. श्रध्दा जोशी यांनी भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे काय कमवलेॽकाय गमवलेॽ या विषयावर आपला निबंध तयार केला होता.
स्पर्धा सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुली होती.देशासंबंधीच्या महत्त्वाच्या विषयावर अमृतमंथन घडविण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली गेली होती.स्पर्धेसाठीचे निबंध १२०० शब्दांचे असावेत व त्यामधील लिखान स्वत:च्या अक्षरात लिहिने गरजेचे होते. त्याचप्रमाणे विविध क्षेत्राशी संबंधित चार विषयांची यादी निश्चित केली गेली होती त्यापैकी कोणत्याही एका विषयावर मराठी भाषेत निबंध लिहावयाचा होता.
श्रध्दा जोशी यांनी निबंध स्पर्धेत प्राप्त केलेल्या या यशामुळे संपूर्ण जिल्ह्यातून त्यांचे कौतुक केले जात आहे.