प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कामाचा गौरव

रत्नागिरी : शब्बीर मजगावकर

दि. 17:-  15 ऑगस्ट 2022 रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी दिना निमित्त कार्यक्रमात मंत्री उदय सामंत, यांच्या हस्ते  प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांना ” आयुष्यमान भारत अंतर्गत, महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजनेच्या” उल्लेखनीय व अनुकरणीय कार्याकरिता प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. प्रादेशिक मनोरुग्णालय रत्नागिरी यांनी केवळ रत्नागिरी जिल्हयातच नव्हे तर संपूर्ण कोकण विभागातील खाजगी व शासकीय रुग्णालयात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

या रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. आमोद गडीकर, मानोसोपचार तज्ञ डॉ. संजयकुमार कलकुटगी, वैदयकीय अधिकारी डॉ. अविनाश ढगे व व्यवसाय उपचार तज्ञ कृणाल देसाई यांनी रुग्णालयातर्फे प्रशस्तीपत्रक स्वीकारले.

सदर योजनेचे यशस्वीतेकरिता राज्य आरोग्य हमी सोसायटी च्या सर्व अधिकारी, डॉ. कोमल हुले, डॉ. चौगुले, ऋषीकेश शेलार व संकेत हातीस्कर यांचे सुध्दा मोलाचे सहकार्य लाभले.  या योजनेतून रुग्णालयाना मिळणाऱ्या निधीतून रुग्णांकरिता अधिक सोयी सुविधा देण्याच्या उद्देशाने व विविध उपक्रम राबविण्याकरता मदत होणार आहे, असे डॉ. गडीकरांनी सांगितले.

15 ऑगस्ट 2022 रोजी, प्रादेशिक मनोरुग्णालयात अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन जल्लोषात साजरा करण्यात आला. रुग्णालयाचे वैदयकीय अधिक्षक डॉ. आमोद गडीकर यांनी रुग्णालयाचे सर्व कर्मचारी, अधिकारी व रुग्णांच्या उपस्थितीत ध्वजारोहण केले. .  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्याने रुग्णांचे विविध कार्यक्रम व स्पर्धा आयोजिल्या होत्या. कार्यक्रमाची सुरुवात रुग्णांच्या कवायतीने झाली, रुग्णांनी सर्व स्पर्धांमध्ये उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. सर्व स्पर्धा अंती वैदयकीय अधिक्षक डॉ. आमोद गडीकर, रुग्णालयाचे मानोसोपचार तज्ञ डॉ. लवेकर व डॉ. कलकुटगी, वैदयकीय अधिकारी डॉ. ढगे, प्रभारी मेट्रन श्रीमती हर्डीकर यांच्या हस्ते रुग्णाच्या स्पर्धेतील सहभागाकरिता कौतुक सोहळा पार पडला, तसेच हा कार्यक्रम यशस्वी करणेकरिता रितिका गावडे, मिलिंद भागवत, अभिजीत आग्रे, अमरजीत लाडी, ऋषीकेश शेलार, प्रांजल चव्हाण व अश्या अनेक कर्मचाऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरुपात सत्कार करण्यात आला व कार्यक्रम संपन्न झाला.