इचलकरंजी: हबीब शेखदर्जी
दि .२८: वस्त्रनगरी इचलकरंजी शहराचा वाढता विस्तार, लाेकसंख्या आणि वाढते औद्याेगिकरण लक्षात घेता कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी इचलकरंजीत अपर पाेलीस अधीक्षक आणि पाेलीस उपअधीक्षक यांच्या स्वतंत्र प्रशासकीय कार्यालयासासाठी राज्य शासनाने १७ काेटी ८३ लाख ७४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. आमदार राहुल आवाडे यांनी या संदर्भात शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या महत्त्वाच्या प्रशासकीय इमारतीच्या उभारणीचा मार्ग माेकळा झाला आहे.इचलकरंजी हे एक प्रमुख औद्याेगिक आणि व्यावसायिक केंद्र असून काेल्हापूर जिल्ह्यातील दुसèया क्रमांकाचे माेठे शहर आहे. शहराची लाेकसंख्या आणि भाैगाेलिक पसारा गतीने वाढत चालल्याने पाेलिस प्रशासनावरील कामाचा ताणही वाढत आहे. नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी आणि तक्रारींच्या निवारणासाठी अधिक सहज यंत्रणा उपलब्ध व्हावी, यासाठी शहरात एकाच ठिकाणी अपर पाेलीस अधीक्षक व पाेलीस उपअधीक्षक कार्यालय उभारण्याची मागणी हाेत हाेती.
या संदर्भात आमदार राहुल आवाडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटीतून या विषयाचा सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवला हाेता. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शासनाने या कार्यालयांसाठी नवीन प्रशासकीय इमारत उभारण्यास हिरवा कंदील दर्शवला आहे. थाेरात चाैकातील इचलकरंजी पाेलिस ठाणे (गावभाग पाेलिस ठाणे) लगत असलेल्या जुनी पाेलिस क्वाॅर्टर्स व माेकळ्या जागेत ही प्रशस्त कार्यालये उभारण्यात येणार आहेत. त्यासाठीची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून लवकरच प्रशस्त इमारतींची उभारणी केली जाणार आहे.
या महत्वाच्या निर्णयामुळे इचलकरंजी शहर आणि परिसरातील ग्रामीण भागातील पाेलीस यंत्रणेचे कामकाज एकाच छताखाली व गतिमान पद्धतीने चालण्यास माेठी मदत हाेणार आहे. तसेच, वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे आणि नागरिकांना जलद न्याय मिळवून देणे साेपे हाेणार आहे. इचलकरंजीच्या कायदा-सुव्यवस्थेला बळकटी मिळणार आहे, असे आमदार राहुल आवाडे यांनी म्हटले आहे.